नाराजीतून सरकारमधील आठ आमदार गायब झाले होते. ते सर्व आठ आमदार परतले असून सर्व नाराज आमदारांची नाराजी दूर करणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळात सहा आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ...
भाजपच्या नेत्यांनी केवळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसून राज्याच्या विकासावर आक्रमण केले आहे. शेतकरी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यावर भाजपने वार केल्याचे कमलनाथ म्हणाले. ...
काँग्रेसच्या एका आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे. मात्र, आपल्याकडे कोणाचाही राजीनामा आलेला नाही, असे विधानसभा अध्यक्षांचे म्हणणे आहे. ...
या व्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाच्या आमदारासह अपक्ष आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकारमध्ये अजुनही पाच मंत्रीपद रिक्त आहेत. त्यामुळे नाराज नेत्यांची या मंत्रीपदांवर वर्णी लागू शकते. ...