एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 08:10 AM2020-03-06T08:10:52+5:302020-03-06T08:21:11+5:30

भाजपानं आमिष दिल्याचा आरोप काँग्रेस आमदारानं फेटाळला

congress mla hardeep singh dang resigns from madhya pradesh assembly | एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा

एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा

Next
ठळक मुद्देदोनदा निवडून येऊनही पक्षानं दुर्लक्ष केलं; आमदारानं व्यक्त केली नाराजीकाँग्रेस आघाडीतले तीन आमदार अद्याप बेपत्ताकाँग्रेस सरकारला पाठिंबा देणाऱ्या बसपा आमदारही आक्रमक

भोपाळ: मध्य प्रदेशातल्या एका काँग्रेस आमदारानं विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. मंगळवार रात्री काँग्रेस आघाडीतले दहा आमदार बेपत्ता झाले होते. मात्र यातले चार आमदार कालपर्यंत परतले नव्हते. त्यातले एक आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल रात्री विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्याकडे राजीनामा पाठवला. दोनदा जनादेश मिळूनही पक्षानं सतत दुर्लक्ष केल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'एकही मंत्री काम करायला तयार नाही. कारण ते एका भ्रष्ट सरकारचा भाग आहेत,' असं सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. 

मध्य प्रदेशात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मंगळवारी रात्री अचानक काँग्रेस आघाडीतले १० आमदार दिल्लीला रवाना झाले. त्यातले ६ आमदार माघारी परतल्याची माहिती काँग्रेसनं दिली. तर ४ आमदारांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यापैकी सुवासरा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल राजीनामा दिला. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिंग यांनी आपल्याला भाजपानं ओलीस ठेवल्याचा आरोप फेटाळून लावला. भाजपानं आपल्या आमदारांना ओलीस ठेवल्याचा आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवल्याचा आरोप याआधी काँग्रेसनं केला होता. 

आमदार हरदीप सिंग डंग यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. मात्र डंग यांचा राजीनामा आपल्याला मिळाला नसल्याचं मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितलं. सिंग यांच्यासोबत बेपत्ता झालेले तीन आमदार अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. डंग यांच्याप्रमाणेच आमदार रमाबाई यांनीदेखील भाजपानं आमिष दिल्याचा आरोप फेटाळला आहे. भाजपानं मला दिल्लीला नेलं या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. मी स्वत:हून दिल्लीला गेले. माझ्या मुलीनं आधीच माझं विमान तिकीट काढलं होतं. मला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही चुकीचा आहे. कोणीही मला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही. मग ती काँग्रेस असो वा भाजपा, असं बसपाच्या आमदार रमाबाई यांनी सांगितलं. 

विधानसभेतलं पक्षीय बलाबल किती?
मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. मात्र दोन आमदारांच्या निधनामुळे सध्या विधानसभेतल्या आमदारांची संख्या २२८ आहे. कालपर्यंत विधानसभेत काँग्रेसचे ११५ आमदार होते. मात्र सिंग यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ११४ झाली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या १०७ इतकी आहे. समाजवादी पार्टीच्या दोन आमदारांसह चार अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यातला एक आमदार अद्याप बेपत्ता आहे. 
 

Web Title: congress mla hardeep singh dang resigns from madhya pradesh assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.