लोकलने प्रवास करण्याची परवानगी नसल्याने अनेक वकिलांना न्यायालयांत पोहचण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, असे याचिककर्त्यांचे वकील न्यायालयाला सांगितले. ...
कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती(एपीएमसी)ची निवडणूक पुढे का ढकलली, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
शहराच्या हृदयस्थळी असलेले हेरिटेज कस्तुरचंद पार्क मैदान खड्डे बुजवून व इतर कामे पूर्ण करून दोन आठवड्यात पूर्ववत करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका, मेट्रो रेल्वे व इतरांना दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला नागनदी पुनरुज्जीवन योजनेची माहिती सादर करण्याचा आदेश दिला. याकरिता महानगरपालिकेला आठ आठवड्याचा वेळ देण्यात आला. ...
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशा मागण्यांसह माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. ...