गर्डे हदगाव (ता.अंबड) येथील ॠषिकेश भीमराव मस्के यांच्या शेतात गोठ्यात बांधलेले गायीचे वासरू बिबट्याने फरफटत नेत बाजूला असलेल्या शेख अयुब शेख अमीन यांच्या शेतात जाऊन त्याचा फाडशा पाडला. ...
शेडगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या आजदा शिवारातील शेतातील दोन एकरातील ऊस पीक रानडुक्करांनी नष्ट केले आहे. सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काळे यांनी जानेवारी महिन्यांत ऊसाची लागवड केली होती. ...
गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात दहशत पसरविणाऱ्या वाघाला शोधण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो रुपये खर्चूनही वाघ शोधता आला नाही. पावसाळ्याचे दिवस पाहून मोहीम थांबविण्यात आली आणि मोहीम थांबताच वाघाने शनिवारी पुन्हा एका वृद्ध गुराख् ...
प्रासंगिक : २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. शाळेच्या पाठ्यपुस्तकातून हे सांगण्यात येते. मराठवाड्यात कधी काळी वाघाचे अस्तित्व असल्याचे दाखले, संदर्भ देण्यात येतात; मात्र दुष्काळ, वेगाने कमी होणाऱ्या जंगला ...
विहिरीच्या कठड्याला लागून असलेल्या एका जुन्या स्लॅबवर संरक्षक कठडा ओलांडून चंद्रमोरे हे शिडीसोडण्यासाठी उतरले; मात्र स्लॅब पावसाने कमकुवत झाला असल्याने अचानकपणे कोसळला व चंद्रमोरे विहिरीत कोसळले. ...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील राज्य सेवेतील वनाधिकाऱ्यांना भारतीय वनसेवा (आयएफएस) दर्जा बहाल करून पदोन्नती दिली आहे. यात महाराष्ट्रातील ११ विभागीय वनअधिकारी असून, सेवानिवृत्त झालेल्या दोन वनअधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ...
तालुक्यातील जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एकाने अतिक्रमण करीत जंगलातील झाडे विनापरवानगीने कापले आहे. मात्र याप्रकाराकडे वनविभागचे दुर्लक्ष होत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांनी सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १ मधील कंपार्टमेंट क्रमांक २१५ मध्ये सागवान वृक्षाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली आहे. ...