देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:55 IST2026-05-13T15:51:03+5:302026-05-13T15:55:16+5:30
BJP MLA Travel Mumbai Goa Tejas Express: आपणही शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडूया, असे आवाहन मुंबईकर आमदारांनी केले आहे.

देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
BJP MLA Travel Mumbai Goa Tejas Express: पेट्रोल आणि डिझेलची बचत करा. परदेशी दौरे टाळा, सोने खरेदी लांबणीवर टाका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना केले. परंतु, यानंतर पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भाजपामधूनच संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. यातच मुंबईकर आमदारांना पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत थेट मुंबई गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास केला. तसेच देश मजबूत करूया, पंतप्रधान मोदी यांना साथ देऊया, असे आवाहनही केले.
आम्ही ६ जण चिपळूणला प्रवासासाठी निघालो आहोत. रस्त्याने गेलो असतो तर २ कार लागल्या असत्या, मात्र आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वेळेची बचत होईलच, शिवाय पेट्रोलचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. देशहितासाठी छोट्या-छोट्या गोष्टींमधून योगदान देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती बोरिवली विधानसभेचे आमदार संजय उपाध्याय यांनी दिली.
देशाला मजबूत करूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देऊया
एक्सवरील पोस्टमध्ये पुढे संजय उपाध्याय म्हणाले की, शक्य तिथे खाजगी वाहनांचा कमी वापर करून लोकल ट्रेन, मेट्रो, एसी ट्रेन आणि बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा अधिक वापर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी स्वतःही आठवड्यातून दोन दिवस रेल्वेने प्रवास करून देशाला मजबूत करण्यासाठी माझे योगदान देणार आहे. आपणही शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडूया. देशाला मजबूत करूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देऊया, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला भाजपासह एनडीएतील घटक पक्षांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाचे १२ आमदार जपानच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतला. तर, दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी कुटुंबासोबतचा नियोजित युरोप दौरा रद्द केला.
नमस्कार,
— Sanjay Upadhyay (@SanjayRupadhyay) May 13, 2026
आज आम्ही ६ जण चिपळूणला प्रवासासाठी निघालो आहोत. रस्त्याने गेलो असतो तर २ गाड्या लागल्या असत्या, मात्र आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे वेळेची बचत होईलच, शिवाय पेट्रोलचीही… pic.twitter.com/bbuPjlHFPn