वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:28 IST2026-05-13T15:27:36+5:302026-05-13T15:28:57+5:30
CRPF Jawans Viral Video: जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कार चालवताना एका चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, तिथे तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांनी तातडीने मदत केल्यामुळे चालकाचा जीव वाचला आहे.

वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कार चालवताना एका चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, तिथे तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांनी तातडीने मदत केल्यामुळे या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले आहे. माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या जवानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बिजबेहारा परिसरातून एक कार जात असताना, अचानक चालकाला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याने कार थांबवली. काही वेळातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी महामार्गाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या ९० व्या बटालियनच्या रूट ओपनिंग पार्टीमधील जवानांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी वेळ न घालवता चालकाला प्राथमिक उपचार देण्यास सुरुवात केली. जवानांनी त्याला वेळीच सीपीआर दिल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या चालकाची प्रकृती स्थिर आहे.
Timely action by CRPF saved a precious life in Kulgam. Personnel of CRPF’s 90 Battalion acted with remarkable speed and professionalism after a man suffered a serious cardiac emergency on the Jammu-Srinagar National Highway. The jawans immediately administered CPR, provided… pic.twitter.com/wi65F5RACW
— Mike Lima (@MikeLimaBravo12) May 13, 2026
जवानांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे एका निष्पाप व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी वर्दीतील देवदूत अशा शब्दांत जवानांचे कौतुक केले आहे. केवळ शत्रूशी लढणेच नाही, तर सामान्य नागरिकांच्या संकटात धावून जाणे हेच भारतीय सैन्याचे खरे वैशिष्ट्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.