अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:33 IST2026-05-13T15:32:50+5:302026-05-13T15:33:19+5:30
Footballer Ederson Bizarre superstition: मँचेस्टर सिटीसाठी त्याने २७३ हून अधिक सामने खेळले

अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Footballer ederson bizarre superstition wearing same underwear: प्रत्येक खेळातील खेळाडूंच्या स्वतःच्या काही मान्यता किंवा सवयी असतात. काही लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात. पण त्या खेळाडूंना मात्र त्याचा अनुभव येत असतो. त्यामुळे त्या खेळाडूंना याबाबत काहीही वाटत नाही. ब्राझीलच्या एका फुटबॉलपटू बद्दलही अशीच एक अजब-गजब गोष्ट समोर आली आहे. तब्बल आठ वर्षांपासून मँचेस्टर सिटीचा गोलकिपर आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू एडरसन हा प्रत्येक सामना एकच अंडरवेयर (Boxer Shorts) घालून खेळत आहे. खुद्द त्यानेच याबाबत एका मुलाखतीत ही सवय सांगितली.
एडरसनेची अजब-गजब सवय
२०१७ मध्ये मँचेस्टर सिटीमध्ये सामील झालेल्या एडरसनने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून तो एकच अंडरवेयर घालून सर्व सामने खेळत होता. विशेष बाब म्हणजे, असे करत असताना एडरसनने मँचेस्टर सिटीसोबत अनेक ट्रॉफीही जिंकल्या आहेत. बीबीसी 'मॅच ऑफ द डे' वर बोलताना त्याने खुलासा केला की सामन्यासाठी तो केवळ एकच सवयीच्या आधीन होता. तो प्रत्येक सामना एकाच अंडरवेयरमध्ये खेळायचा. तो हे आठ वर्षांपासून करत आहे. एडरसनने हे सांगितल्यावर, मुलाखतकाराने त्याला उत्सुकतेने विचारले की ती अंडरवेयर आता नक्कीच चांगल्या स्थितीत नसेल ना..! त्यावर एडरसनने "नाही," असे उत्तर दिले आणि मग दोघेही भरपूर हसायला लागले.
Ederson has been wearing the same boxers on matchdays for EIGHT YEARS. 🤯 😅#MCFC#BBCFootballpic.twitter.com/dDIU6jfc58
— Match of the Day (@BBCMOTD) April 2, 2025
एडरसनने मँचेस्टर सिटीसाठी २७६ सामने खेळले
एडरसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१८ मध्ये चिलीविरुद्ध पदार्पण केले. हा सामना ब्राझीलने ३-० ने जिंकला होता. एडरसनची कतारमधील २०२२ च्या फिफा विश्वचषकासाठीही निवड झाली होती. त्याने ब्राझीलच्या संघासाठी फक्त एकच सामना खेळला, जो संघ उपांत्यपूर्व फेरीचा सामना होता. त्याने आतापर्यंत ब्राझीलसाठी ३१ सामने खेळले असून मँचेस्टर सिटीसाठीही २७६ सामन्यांमध्ये तो सहभागी झाला आहे.