Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:57 IST2026-05-13T09:45:29+5:302026-05-13T11:57:42+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
13 May, 26 : 11:57 AM
शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे. त्यावर आता सुनील तटकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे प्रयोजन होते, परंतु…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) May 13, 2026
13 May, 26 : 11:40 AM
१३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
प्रतीक यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत जिममध्ये असणाऱ्या एका मित्राने सांगितलं की, प्रतीक आपल्या फिटनेसची खूप काळजी घ्यायचे आणि सर्वांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागायचे. त्यांनी अत्यंत मोठा खुलासा केला. "प्रतीक खूप फिट राहायचे. मात्र प्रत्येक घराप्रमाणे त्यांच्याही घरात जेव्हा काही वाद झाले, तेव्हा ते थोडे टेन्शनमध्ये देखील होते आणि त्यामुळे कदाचित डिप्रेशनमध्येही होते" असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
13 May, 26 : 11:25 AM
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे.
13 May, 26 : 11:09 AM
सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
पुणे : नसरापूर येथे लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या चिमुरडीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, त्या जखमा टणक वस्तूने केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्या वस्तूबाबत चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नाही. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपीच्या हातामध्ये शेवेचा पुडा दिसत आहे. ती शेव त्याने कोठून खरेदी केली याबाबत प्रश्न विचारला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असून, तपासात सहकार्य करत नाही, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. वाचा सविस्तर
13 May, 26 : 11:07 AM
सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मंजूर झालेले परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत.
13 May, 26 : 10:42 AM
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी, पाहा काय आहेत नवे दर
केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानं आज कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली असून एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०,००० रुपयांनी तर चांदी १८,००० रुपयांहून अधिक महागली आहे.
अधिक वाचा
केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानं आज कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.#gold#silverhttps://t.co/Fqf846WmBT
— Lokmat (@lokmat) May 13, 2026
13 May, 26 : 10:38 AM
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी, पाहा काय आहेत नवे दर
केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानं आज कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली असून एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०,००० रुपयांनी तर चांदी १८,००० रुपयांहून अधिक महागली आहे.
अधिक वाचा
13 May, 26 : 10:33 AM
उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार?
उत्तर भारतासह महाराष्ट्रातही उष्णतेची लाट तीव्र झाली असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलासादायक वृत्त दिले आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सूनच्या या प्रवासादरम्यान उत्तर आणि पश्चिम भारताला पुढील काही दिवस तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. (सविस्तर वाचा)
13 May, 26 : 10:15 AM
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं
पुणे - जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान दुर्घटनेची घटना घडली आहे. बारामतीतील गोजुबावी गावाच्या हद्दीत रेडबर्ड (Redbird) कंपनीचे प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
#WATCH | Today, at around 8:50 AM, a training aircraft belonging to Red Bird Aviation made a crash landing near Gojubavi village adjacent to the Baramati airport. During the crash landing, a part of the aircraft hit a light pole before the aircraft crashed onto the ground. Only… pic.twitter.com/DRED6iWhG9
— ANI (@ANI) May 13, 2026
13 May, 26 : 10:15 AM
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता व्हेनेझुएलावर डोळा? ‘अमेरिकेचे ५१वे राज्य’ दर्शवणारी 'ती' पोस्ट चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेनेझुएलाचा एक नकाशा शेअर केला असून, त्यात त्या देशाला अमेरिकेचे “५१वे राज्य” म्हणून दाखवण्यात आले आहे.
13 May, 26 : 10:14 AM
प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे धाकटे भाऊ आणि भाजपा नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण उत्तर प्रदेशात शोकाकुल वातावरण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव घरातील किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी घरात उपस्थित असलेल्या लोकांनी कॉल करून या घटनेची माहिती रुग्णालयाला दिली. पती प्रतीक यांच्या निधनावेळी अपर्णा यादव घरात नव्हत्या. वाचा सविस्तर
13 May, 26 : 10:12 AM
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर २४ तासांच्या आतच केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. सोन्या-चांदीच्या आयातीवरील सीमा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता भारतात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंची आयात करणे महाग होणार असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेतील किमतींवर होणार आहे. (सविस्तर वाचा)