Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 10:06 IST2026-05-13T10:04:12+5:302026-05-13T10:06:24+5:30

Aparna Yadav And Prateek Yadav : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे धाकटे भाऊ आणि भाजपा नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं निधन झालं आहे.

Aparna Yadav husband Prateek Yadav passes away found unconscious at home | Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?

Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे धाकटे भाऊ आणि भाजपा नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण उत्तर प्रदेशात शोकाकुल वातावरण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव घरातील किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी घरात उपस्थित असलेल्या लोकांनी कॉल करून या घटनेची माहिती रुग्णालयाला दिली. पती प्रतीक यांच्या निधनावेळी अपर्णा यादव घरात नव्हत्या.

अपर्णा यादव काल रात्री दिल्लीत होत्या. पतीच्या निधनाची बातमी समजताच त्या तातडीने लखनौसाठी रवाना झाल्या आहेत. पोलिसांनी प्रतीक यादव यांचा फोन ताब्यात घेतला आहे. तसेच घरात ते त्यावेळी काय करत होते याचा तपशील पोलीस गोळा करत आहेत. प्रतीक यादव यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार असून या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाईल. चार डॉक्टरांचं पथक हे शवविच्छेदन करणार आहे.

५:५५ वाजता रुग्णालयात आणलं

प्रतीक यांना पहाटे ५:५५ वाजता रुग्णालयात आणण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. ३० एप्रिल रोजी प्रतीक यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे डॉक्टर त्यांना डिस्चार्ज देत नव्हते, परंतु ते जबरदस्तीने रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी आले आणि विश्रांती घेत होते.

मुलायम सिंह यादव यांचे पुत्र 

३८ वर्षांचे प्रतीक यादव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे पुत्र होते. राजकीय कुटुंबाशी संबंधित असूनही प्रतीक राजकारणापासून दूर राहिले. त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहणं आवडत नव्हतं आणि ते साधे जीवन जगत असत. त्यांना जिम आणि व्यायामाची प्रचंड आवड होती.

Web Title : प्रतीक यादव का निधन: अपर्णा यादव दुखद घटना के समय कहाँ थीं?

Web Summary : अखिलेश यादव के भाई प्रतीक यादव रसोई में बेहोश पाए गए। अपर्णा यादव दिल्ली में थीं। पोस्टमार्टम जारी है। उन्हें हाल ही में अस्पताल से छुट्टी मिली थी।

Web Title : Prateek Yadav Dies: Aparna Yadav's Whereabouts During the Untimely Demise?

Web Summary : Prateek Yadav, Akhilesh Yadav's brother, found unconscious in kitchen. Aparna Yadav was in Delhi. Post-mortem investigation underway. He was discharged against medical advice recently.