प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 10:23 IST2026-05-13T10:22:05+5:302026-05-13T10:23:19+5:30

मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र प्रतीक यादव यांचे निधन झाले आहे. लखनौ पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अपर्णा यादव यांच्या घरी चौकशी होणार आहे.

After Prateek Yadav's death, police will go to Aparna Yadav's house; mystery grows, what exactly happened? | प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?

प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?

समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव (३८) यांचे बुधवारी अकाली निधन झाले. मात्र, या निधनानंतर आता लखनौ पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला आहे. पोलिसांचे एक पथक अपर्णा यादव यांच्या घरी जाऊन घटनेच्या वेळी तिथे नेमकी काय परिस्थिती होती, याची चौकशी करणार आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव हे आज सकाळी त्यांच्या घराच्या किचनमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले होते. घरातील लोकांनी तातडीने त्यांना लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. प्रतीक यांचे वय अवघे ३८ वर्षे असल्याने त्यांच्या अशा अचानक जाण्याने उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस तपासाला वेग, फोन घेतला ताब्यात

प्रतीक यादव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतीक यांचा मोबाईल फोन आपल्या ताब्यात घेतला आहे. मृत्यूच्या वेळी घरात कोण-कोण उपस्थित होते आणि त्यावेळची नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास पोलीस करणार आहेत.

डॉक्टरांचा सल्ला डावलून आले होते घरी

कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी प्रतीक यादव यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारत असतानाही डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. मात्र, डॉक्टरांचे म्हणणे न ऐकता प्रतीक यांनी हट्ट धरून सुट्टी घेतली आणि ते घरी आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच विश्रांती घेत होते.

पोस्टमॉर्टमची होणार व्हिडिओग्राफी

प्रतीक यादव यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी KGMU रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ४ डॉक्टरांच्या विशेष टीममार्फत पोस्टमॉर्टम केले जाणार असून, या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनेच्या वेळी अपर्णा यादव दिल्लीत होत्या, पतीच्या निधनाची बातमी मिळताच त्या लखनौसाठी रवाना झाल्या आहेत.

Web Title : अखिलेश यादव के भाई की मौत की पुलिस जांच, रहस्य गहराया

Web Summary : अपर्णा यादव के पति प्रतीक यादव का 38 वर्ष की आयु में निधन हो गया। लखनऊ पुलिस परिस्थितियों की जांच कर रही है, खासकर उनकी मौत से पहले की घटनाओं पर ध्यान केंद्रित है। हाल ही में डॉक्टरों की सलाह के खिलाफ अस्पताल से छुट्टी मिलने के बाद वह घर पर बेहोश पाए गए। वीडियोग्राफी के साथ पोस्टमार्टम का आदेश दिया गया है।

Web Title : Police Investigate Death of Akhilesh Yadav's Brother, Sparking Mystery

Web Summary : Prateek Yadav, husband of Aparna Yadav, died suddenly at 38. Lucknow police are investigating the circumstances, focusing on events leading up to his death. He was found unconscious at home after being recently discharged from hospital against doctor's advice. A post-mortem with videography is ordered.