Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 10:47 IST2026-05-13T10:45:29+5:302026-05-13T10:47:33+5:30

Prateek Yadav Dies at 38:  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र आणि फिटनेस आयकॉन प्रतीक यादव यांचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाले.

Prateek Yadav: Fitness obsession, passion for luxury cars, affection for animals; Some special things about Prateek Yadav | Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!

Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र आणि फिटनेस आयकॉन प्रतीक यादव यांचे बुधवारी सकाळी निधन झालेय. प्रतीक यादव यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने यादव कुटुंबासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या वैयक्तिक जीवनशैलीची, फिटनेसप्रेमाची आणि लक्झरी जीवनशैलीची चर्चा सर्वत्र रंगत आहे. 

प्रतीक यादव हे उत्तर प्रदेशातील सर्वात प्रभावशाली राजकीय घराण्याशी संबंधित असले तरी त्यांनी नेहमीच प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. राजकारणापेक्षा त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यावर भर दिला . मात्र, सोशल मीडियावर ते बऱ्यापैकी सक्रिय होते आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक क्षण चाहत्यांसोबत शेअर करायचे.

फिटनेसचे वेड

प्रतीक यादव यांना फिटनेसची विशेष आवड होती. नियमित व्यायाम, वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ वर्कआउट्स हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग होते. एक बॉडीबिल्डर म्हणूनही त्यांची ओळख होती. लखनौमध्ये त्यांनी स्वतःची जिम सुरू केली होती.  जिममधील व्यायामाचे व्हिडिओ आणि फोटो ते अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत असत. त्यांच्या फिटनेसकडे पाहून अनेक तरुण त्यांना प्रेरणास्थान मानत होते.

लक्झरी गाड्यांचे शौकीन

फिटनेससोबतच प्रतीक यादव यांना लक्झरी गाड्यांची आवड होती. लक्झरी कार कलेक्शन आणि कार रेसिंग हा त्यांचा खास छंद मानला जात असे. त्यांना अनेकदा सुपरकार्ससोबत पाहिले गेले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे  लॅम्बोर्गिनीसारखी आलिशान कारही होती.  या गाडीची किंमत अंदाजे ५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

टॅटूंची विशेष आवड

प्रतीक यादव यांना टॅटू काढण्याचीही विशेष आवड होती. त्यांच्या शरीरावर अनेक स्टायलिश टॅटू होते, ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि दमदार दिसत असे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये हे टॅटू स्पष्टपणे पाहायला मिळत होते.

प्राण्यांविषयी जिव्हाळा

प्रतीक यादव हे नेहमीच आपल्या पाळीव कुत्र्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असत. अनेकदा ते कुत्र्यांसोबत खेळताना किंवा इतर मुक्या प्राण्यांवर प्रेम व्यक्त करताना दिसले.  प्राणी कल्याणाशी संबंधित विषयांनाही त्यांनी अनेक वेळा पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे फिटनेसप्रेमी आणि कारप्रेमी प्रतिमेसोबतच त्यांची संवेदनशील व्यक्ती अशीही ओळख निर्माण झाली होती.

Web Title : प्रतीक यादव: फिटनेस, लग्जरी कारें, और जानवरों के प्रति प्रेम

Web Summary : मुलायम सिंह यादव के बेटे प्रतीक यादव का 38 वर्ष की आयु में निधन हो गया। वे फिटनेस, लग्जरी कारों और जानवरों के प्रति प्रेम के लिए जाने जाते थे। पारिवारिक राजनीतिक प्रभाव के बावजूद, उन्होंने फिटनेस पर ध्यान केंद्रित किया और सोशल मीडिया पर अपने जीवन की झलकियाँ साझा कीं।

Web Title : Prateek Yadav: Fitness, Luxury Cars, and Love for Animals

Web Summary : Prateek Yadav, son of Mulayam Singh Yadav, passed away at 38. Known for his fitness obsession, luxury car collection, and love for animals, he maintained a low public profile despite his family's political prominence, focusing on fitness and sharing glimpses of his life on social media.