हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 10:40 IST2026-05-13T10:39:51+5:302026-05-13T10:40:45+5:30

दोन विद्यार्थ्यांमध्ये मच्छरदाणी लावण्यावरून जोरदार वाद आणि हाणामारी झाली.

roommates clash over mosquito nets aligarh muslim university mosquitoes problem | हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले

हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले

अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU) एसएस नॉर्थ हॉलमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये मच्छरदाणी लावण्यावरून जोरदार वाद आणि हाणामारी झाली. बीए सेकंड ईयर आणि थर्ड ईयरमध्ये शिकणाऱ्या या रूममेट्समधील वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा एका विद्यार्थ्याने आपल्या बेडवर मच्छरदाणी लावली. गाझीपूरचा रहिवासी असलेल्या त्याच्या रूममेटने असा दावा केला की, मच्छरदाणीमुळे कूलरची हवा थांबली आणि खोलीतील सर्व डास त्याला चावू लागले. या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं असून दोन्ही विद्यार्थ्यांनी एकमेकांविरुद्ध प्रॉक्टर ऑफिसमध्ये लेखी तक्रार दाखल केली. विद्यापीठ प्रशासन आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.

मच्छरदाणी ठरली वादाचं मूळं कारण

मिळालेल्या माहितीनुसार, एसएस नॉर्थ हॉलच्या एका खोलीत राहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्याने डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी लावली. त्याच्या रूममेटला ही गोष्ट आवडली नाही. त्याचा तर्क अत्यंत चक्रावून टाकणारा होता. त्याने असा आरोप केला की, मच्छरदाणी लावल्यामुळे डास आता त्याच्याकडे जास्त येत आहेत. तो विद्यार्थी म्हणाला, "तुझ्या भागातील डास देखील आता मलाच चावत आहेत."

विद्यार्थी एकमेकांशी भिडले

हे प्रकरण केवळ डासांपुरते मर्यादित राहिलं नाही. गाझीरच्या विद्यार्थ्याने दुसरा आरोप असा केला की, मच्छरदाणीमुळे खोलीतील कूलरची हवा त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. या छोट्याशा तक्रारींनी मोठ्या वादाचं रूप घेतलं. पाहता पाहता दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक, शिवीगाळ आणि त्यानंतर हाणामारी सुरू झाली. दोन्ही विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने हॉस्टेलमधील वातावरण तापलं होतं.

प्रॉक्टर ऑफिसमध्ये तक्रार

घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रॉक्टर ऑफिसमध्ये तक्रार केली. एएमयूचे प्रॉक्टर प्रोफेसर नावेद अली खान यांनी सांगितलं की, ही घटना दोन विद्यार्थ्यांमध्ये घडली आहे. विद्यार्थ्यांची समजूत काढून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांनी कठोर शब्दांत हे देखील स्पष्ट केलं की, जर कोणीही कायदा हातात घेतला असेल, तर त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल.

Web Title : मच्छरदानी को लेकर अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय में रूममेट्स में लड़ाई।

Web Summary : एएमयू में मच्छरदानी को लेकर रूममेट्स में झगड़ा हो गया, जिसके कारण मारपीट हुई। एक का दावा है कि नेट ने कूलर की हवा को रोक दिया और दूसरे के क्षेत्र से मच्छरों को आकर्षित किया। दोनों ने शिकायत दर्ज कराई, और विश्वविद्यालय जांच कर रहा है।

Web Title : Mosquito net sparks fight between roommates at Aligarh Muslim University.

Web Summary : AMU roommates clashed over a mosquito net, leading to a physical altercation. One claimed the net blocked cooler air and attracted mosquitoes from the other's region. Both filed complaints, and the university is investigating.