धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
मराठी भाषा दिन साजरा करीत असताना आज मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही, भाषा विभागातील 40 % पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील सचिव,आय. ए. एस., आय. पी. एस. अधिकारी मराठीत टिपणे इंग्रजीत टाकतात. ...
एकही शेतकरी ऐतिहासिक कर्जमाफीचा लाभार्थी सापडला नाही. म्हणून कर्जमाफी फसवी आहे याबाबतीत मुख्यमंत्री सत्य काय आहे ते सांगणार का, असा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. ...
मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेनेकडेही एका गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे शिवसेना केवळ घोषणा न करता सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल ...
जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. ...