बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोण- रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच हे कपल ईशा अंबानीच्या लग्नात एकत्र स्पॉट झाले होते. ...