Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव

Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव

Gold Silver Rate Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली असून एमसीएक्सवरील सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत प्रति किलो ६,००० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:25 IST2026-04-23T10:21:24+5:302026-04-23T10:25:27+5:30

Gold Silver Rate Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली असून एमसीएक्सवरील सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत प्रति किलो ६,००० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर.

Gold Silver Price Today Silver drops by rs 6000 as market opens gold also becomes cheaper Check the price of 24K 22K 18K in your city | Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव

Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव

Gold Silver Rate Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली असून एमसीएक्स (MCX) वरील सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत प्रति किलो ६,००० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. तर सोन्याचा भाव सुमारे १,००० रुपयांनी खाली आला. 

५ मे रोजी डिलिव्हरी असणारी चांदी मागील सत्रात २,४८,३६४ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, जी आज २,४२,५०१ रुपयांवर उघडली आणि सुरुवातीच्या व्यवहारात ६,१४४ रुपयांच्या घसरणीसह २,४२,२२० रुपयांपर्यंत खाली आली. ५ जून रोजी डिलिव्हरी असणारं सोनं मागील सत्रात १,५२,६५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं आणि आज ते १,५२,०५१ रुपयांवर उघडलं असून सुरुवातीच्या व्यवहारात ९३८ रुपयांच्या घसरणीसह १,५१,७१९ रुपयांपर्यंत खाली आलं.

उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण

सराफा बाजारातील किमती आणि बुधवारचा आढावा

सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळाली असून गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याची किंमत १,२०० रुपयांच्या घसरणीसह १,५३,५५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आली. याचप्रमाणे २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत १,१०० रुपयांची घसरण होऊन ते १,४०,७५० रुपयांवर व्यवहार करत आहे, तर १८ कॅरेट सोने ९०० रुपयांच्या घसरणीसह १,१५,१६० रुपयांवर आलं. 

काय आहेत नवे दर?

शहर२४ कॅरेट२२ कॅरेट१८ कॅरेट
दिल्ली₹153700₹140900₹115310
मुंबई₹153550₹140750₹115160
कोलकाता₹153550₹140750₹115160
चेन्नई₹154480₹141600₹118100
लखनौ₹153700₹140090₹115310


चांदीची किंमत ५,००० रुपये प्रति किलोच्या घसरणीसह २,६०,००० रुपयांवर आली. यापूर्वी बुधवारी सकाळी MCX वर जून डिलिव्हरी असणारं सोनं १,५३,३३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं होते आणि दिवसभरात ते १,५३,६९९ रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. रात्री १०:३० च्या सुमारास सोन्याचा भाव ८७४ रुपयांच्या वाढीसह १,५२,५४५ रुपयांवर व्यवहार करत होता.

Web Title : सोना, चांदी की कीमतों में भारी गिरावट; अपने शहर में दरें जांचें

Web Summary : आज सोना और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। चांदी में ₹6,000 प्रति किलो की गिरावट आई, जबकि सोना भी सस्ता हो गया। प्रमुख शहरों में 24K, 22K और 18K सोने की दरें जांचें।

Web Title : Gold, Silver Prices Drop Sharply; Check Rates in Your City

Web Summary : Gold and silver prices fell sharply today. Silver declined ₹6,000 per kg, while gold also became cheaper. Check rates for 24K, 22K, and 18K gold in major cities.