"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:38 IST2026-04-23T11:38:35+5:302026-04-23T11:38:55+5:30

जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असण्याची शक्यता असल्याचे रोहित पवारांनी सांगितले आहे

''There could be another Pawar vs Pawar battle in the 2029 assembly elections'', says Rohit Pawar | "२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत

"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत

पुणे : २०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असण्याची शक्यता रोहित पवारांनी वर्तवली आहे. बारामतीत मतदानाचा  हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

बारामती मधून २०२९ ला मी उमेदवार असावं असं बारामतीकरांना वाटतं असून ही लोकांची इच्छा असल्याचे जय अजित पवार यांनी बारामती सांगितले होते. त्यावरून रोहित पवार म्हणाले, कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते, ते ऐकावं लागतं. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यावेळी सुनेत्रा काकी (Sunetra Pawar) निवडणुकीला उभं राहणार नसतील तर,  जे कोणी उभं राहील, 2029 ला तशी बघितली तर सर्वपक्षीय लढाई होऊ शकते. बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते.

अजितदादांच्या वेळी, लोकसभेला पवार विरुद्ध पवार झालं आहे. उद्या पुढे जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा दादांची इच्छा होती, पवार परिवार एकत्र आले पाहिजेत. मात्र हे कितीही खरे असले तरी राजकीय दृष्टीकोनातून चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. तसेहच काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. उद्या जाऊन परिवाराला एकत्र यायचं झालं तर आम्ही विरोधात आहोत. पण सत्तेतून काही लोकांना पक्षाला बाहेर येणे, आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करता तो तसा सोपा निर्णय नाही

दरम्यान लोकांची मागणी आहे की, २०२९ मध्ये बारामतीचा उमेदवार मी व्हावं. लोकांची अपेक्षा आहे की, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं लोकांची ती इच्छा असल्याचे जय पोवार यांनी सांगितले होते. 

Web Title : 2029 चुनाव में फिर पवार बनाम पवार की लड़ाई संभव: रोहित पवार

Web Summary : रोहित पवार ने 2029 के विधानसभा चुनाव में फिर से पवार बनाम पवार की लड़ाई की संभावना जताई। यह जय पवार द्वारा बारामती से चुनाव लड़ने की इच्छा व्यक्त करने के बाद आया है, जिससे सुनेत्रा पवार के चुनाव न लड़ने पर बहुदलीय मुकाबला हो सकता है।

Web Title : Pawar vs Pawar battle likely in 2029 election, says Rohit Pawar.

Web Summary : Rohit Pawar anticipates a Pawar versus Pawar contest in the 2029 Assembly elections. This follows Jay Pawar's expression of interest in contesting from Baramati, potentially leading to a multi-party battle if Sunetra Pawar doesn't run.