शिवजयंती सण म्हणून साजरी करण्याचे आवाहन करीत आईवडिलांची सेवा केली तर प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते तथा शिवनिश्चल सेवाभावी संस्थेचे व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले. ...
आजचा युवक हा उद्याच्या प्रगतिशील भारताचा शिल्पकार असून, या युवकांनाच भरकटवण्याचे काम केले जात आहे. यामधून भावी पिढी दिशाहीन होणार असल्याने शिक्षक व पालकांनी सजग राहून दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन कवी प्रशांत मोरे यांनी केले. ...
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या देवळाली फेस्टिव्हलचा समारोप देवळाली रनने झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे, महाराज बिरमानी, दिनकर पाळदे आदींनी हिरवा झेंडा दाखवून रनला शुभारंभ केला. ...
अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे. ...
सार्वजनिक आरोग्य विभाग व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावस्तरावर कामकाज करणाऱ्या आशा वर्कर यांच्या सबलीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली. ...