आजच्या डिजिटल युगात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही मोठ्या शोरूमची किंवा बाजारपेठेतील महागड्या दुकानाची गरज नाही. जर तुमच्याकडे एखादं कौशल्य असेल, एखादं अनोखं उत्पादन असेल किंवा तुमचं स्वतःचं छोटं दुकान असेल, तर तुम्ही घरबसल्या ते देशभरातील कोट्यवधी ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता. अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी छोटे व्यापारी आणि गृहिणींसाठी 'डिजिटल दुकानदार' बनण्याचा मार्ग अत्यंत सोपा केला आहे.
अत्यंत कमी खर्चात या प्लॅटफॉर्म्सवर 'सेलर' बनून तुम्ही तुमचा ई-कॉमर्स प्रवास कसा सुरू करू शकता, कसं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
ई-कॉमर्स व्यवसाय कसा सुरू करावा?
सर्वात आधी तुम्हाला या प्लॅटफॉर्म्सवर एक सेलर अकाउंट तयार करावं लागतं. यासाठी तुम्ही Amazon Seller Central किंवा Flipkart Seller Hub वर जाऊन नोंदणी करू शकता. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि अतिशय सोपी आहे.
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
आवश्यक कागदपत्रं कोणती?
सेलर बनण्यासाठी तुम्हाला काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते, जसं की :
आधार कार्ड आणि पॅन कार्ड
बँक खात्याचा तपशील
GST क्रमांक (काही कॅटेगरीसाठी अनिवार्य)
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
प्रोडक्ट कसं लिस्ट कराल?
नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या उत्पादनाचे फोटो, नाव, किंमत आणि सविस्तर माहिती अपलोड करू शकता. याला 'लिस्टिंग' असं म्हणतात. फोटो आणि माहिती जितकी चांगली असेल, तितकी जास्त ऑर्डर मिळण्याची शक्यता वाढते.
ऑर्डर आणि डिलिव्हरी कशी होते?
जेव्हा एखादा ग्राहक तुमचं उत्पादन खरेदी करतो, तेव्हा तुम्हाला त्याची ऑर्डर मिळते. त्यानंतर पॅकिंग करून तुम्ही ते कुरिअर पार्टनरच्या माध्यमातून पाठवू शकता. अनेकदा Amazon आणि Flipkart स्वतः देखील लॉजिस्टिक सुविधा देतात, ज्यामुळे डिलिव्हरी अधिक सोपी होते.
कमी खर्चात मोठी संधी
या व्यवसायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खूप मोठ्या गुंतवणुकीची गरज नसते. तुम्ही घरूनच काम सुरू करू शकता. दुकानाचे भाडे, कर्मचारी आणि इतर मोठ्या खर्चांची आवश्यकता नसते.
कमाईची उत्तम संधी
ऑनलाइन सेलिंगमुळे तुम्ही केवळ तुमच्या शहरापुरतं किंवा गावापुरतं मर्यादित राहत नाही, तर तुम्हाला संपूर्ण भारतातून ग्राहक मिळतात. जर उत्पादन चांगले असेल आणि योग्य पद्धतीने मार्केटिंग केलं, तर तुमची कमाई वेगानं वाढू शकते.
