देवळाली रनने फेस्टिव्हलचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:39 AM2020-02-17T00:39:08+5:302020-02-17T00:39:44+5:30

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या देवळाली फेस्टिव्हलचा समारोप देवळाली रनने झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे, महाराज बिरमानी, दिनकर पाळदे आदींनी हिरवा झेंडा दाखवून रनला शुभारंभ केला.

Deolali Run concludes Festival | देवळाली रनने फेस्टिव्हलचा समारोप

देवळाली फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी आयोजित देवळाली रनमध्ये विजेत्या ठरलेल्या माधुरी काळे व दिनकर महाले यांना पारितोषिक प्रदान करताना देवीदास वांजळे, दिनकर पाळदे. समवेत संगीता गायकवाड, युवराज मुठाळ, बाबुराव मोजाड आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देदिनकर महाले, माधुरी काळे ठरले विजेते: विविध स्पर्धा उत्साहात

देवळाली कॅम्प : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या देवळाली फेस्टिव्हलचा समारोप देवळाली रनने झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे, महाराज बिरमानी, दिनकर पाळदे आदींनी हिरवा झेंडा दाखवून रनला शुभारंभ केला.
या फेस्टिव्हलचा समारोप रनने करताना गोडसे यांनी सांगितले की, हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक व क्र ीडा क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. या स्पर्धेत दिनकर महाले व माधुरी काळे हे देवळाली रनचे विजेते ठरले. यावेळी नगरसेविका संगीता गायकवाड, देवीदास वांजळे, डॉ. युवराज मुठाळ, परमजितसिंग कोचर, नगरसेवक बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, दीपक बलकवडे, प्रा. सुनीता आडके आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून राम धोंगडे, एन. डी. मुसळे, लक्ष्मण मुसळे आदींनी काम बघितले. आभार संजय गिते यांनी मानले.
देवळाली ‘रन’मधील विजेते स्पर्धक
‘रन’मधील विजेते असे : खुला गट (पुरु ष)- प्रथम- दिनकर महाले, द्वितीय- सुनील निघोट, तृतीय-अतुल बर्डे, चतुर्थ- श्याम वाघ, पाचवा- विक्र म गोडे.
४१४ वयोगट (मुले)- प्रथम- विवेक कराड, द्वितीय- रोशन शिंदे, तृतीय- मोहंमद अन्सारी, चतुर्थ- विशाल म्हसाळ, पाचवा- विवेश शिंदे.
४१७ वयोगट- प्रथम- ऋ षिकेश रावत, द्वितीय- कुमार जाधव, तृतीय- बापूराव तरडे, चतुर्थ- वेदांत ताजणे, पाचवा- विकास निसाळ.
४खुला गट (मुली)- प्रथम- माधुरी काळे, द्वितीय- मनकर्णिका काळे, तृतीय- काजल फडोळ, चतुर्थ- नेहा फडोळ, पाचवी- धनश्री तनपुरे.
४१४ वयोगट (मुली)- प्रथम- कशफीन शेख, द्वितीय- दीक्षा लोहरे, तृतीय- सृष्टी केदार, चतुर्थ- कोमल रोकडे, पाचवी- माधवी शिंदे.
४१७ वयोगट- प्रथम- वेदिका मंडलिक, द्वितीय- अंजली काळे, तृतीय- सविता शिंदे, चतुर्थ- साक्षी लोहरे, पाचवी- प्रियंका हिरसे.

Web Title: Deolali Run concludes Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.