देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मारकडवाडीची माती राहुलजींच्या हाताने बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या चरणी वाहिली जाणार आहे. भारत जोडो यात्रा झाली तशी ही चळवळ आपल्या गावापासून सुरू होईल, असेही पटोले म्हणाले. ...
Dhavalsinh Mohite Patil Resigns : सोलापुरात काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले असून त्यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला. ...
Sambhal Violence: संभलमधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीमध्ये भेट घेतली. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. ...