देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शहर-जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज सकाळी गांधी पुतळा, शहागंज येथे निषेधासन आंदोलन करून देवेंद्र फडणवीस सरकारचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला ...
राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. त्याचे सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला. ...
महापालिकेत परिवर्तनासारखा महत्वाच्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित असताना विरोधीपक्षाचे मत विचारात न घेता मंजूरी देणे, ही बाब चुकीची आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केली आहे. ...
गेल्या चार वर्षात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. फक्त फसव्या घोषणा आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे मुख्यमंत्री काही करत नाहीत. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
या चार वर्षात भाजपाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखविल्याचा आरोप करीत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधासन आंदोलन करण्यात आले़ ...