देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. ...
येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते. ...
इफ्फीसाठी गोवा हे कायम स्थळ म्हणून जाहीर झाले असले तरी यंदाची इफ्फी पाहता दर्जा घसरल्याचे दिसून आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केली आहे. ...
दक्षिण गोव्यातील वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा मानला जाणारा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील झुवारी पूल कमकुवत आणि धोकादायक बनला असल्याची माहिती आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून प्राप्त झाली असल्याचा दावा ...
राज्यातील भाजप सरकार जर बरखास्त करायची काँग्रेसची इच्छा असेल व तशी धमक जर असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे असे आव्हान भाजप देत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...