देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशमधील मतमोजणीचे काम सुरू असतानाच मंगळवारी रात्री मध्य प्रदेशसह, राजस्थान व छत्तीसगडमधील भाजपाचा पराभव मान्य करणारे ट्वीट केले व जनतेचा कौल मान्य असल्याचे जाहीर केले. ...
राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. ...
निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले. ...
शेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजी होती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती. ...