देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
असंख्य बेटांपासून बनलेल्या मुंबई शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळातील बॉम्बेचे मुंबई नामकरण, त्याला असलेला मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी राज्याची राजधानी ही मुंबईची ओळख आता हळूहळू पुसट होत चालली आहे. ...
काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रियंका गांधीं यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणारा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा प्रत्येक उमेदवाराची दमछाक करणारा मतदारसंघ. ...
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घातले होते व प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देऊन एकूण २०० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसने शनिवारी केला. ...
येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बळाचा वाढ-विस्तार चालविला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर प्रचारही सुरू करून दिला आहे. परंतु काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहात असून, स्थानिक पातळीवर सक्रिय ...
ग्लॅमरस मतदारसंघ अशी ‘उत्तर मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाची ओळख. हायप्रोफाईल सेलिब्रेटी, सिनेतारे तारकांचा वावर असणारा हा मतदारसंघ. शिवाय, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि अभिनेते दिवंगत सुनिल दत्त यांच्यामुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत राहीला. ...