मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज

IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

By सुशांत जाधव | Updated: May 3, 2026 17:42 IST2026-05-03T17:39:18+5:302026-05-03T17:42:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs KKR Sunil Narine Creates History Becomes First Overseas Bowler And Third Overall To Take 200 Wickets In IPL | मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज

मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज

Sunil Narine 200 Wickets In IPL : कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फिरकीपटू सुनील नरेन याने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने सलिल अरोराला बाद करत आयपीएलमध्ये २०० विकेट्सचा पल्ला गाठला. नरेन हा IPL इतिहासात २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज ठरला आहे.  एकंदरीत विचार करता IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा तो युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर तिसरा गोलंदाज आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

IPL मध्ये चहलन सर्वात आधी गाठला होता हा पल्ला

IPL च्या इतिहासात सर्वात आधी २०० विकेट्सचा डाव साधण्याचा पराक्रम हा भारतीय लेगस्पिनर युझवेंद्र चहलने केला होता. याच हंगामात आरसीबीच्या ताफ्यातून सर्वोत्तम कामगिरी करत असलेल्या भुवनेश्वर कुमारनं  २०० विकेट्सचा टप्पा गाठला. आता या यादीत कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा समावेश झाला आहे. 

"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करण...

सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी

मागील १४ वर्षांपासून सुनील नरेन कोलकाता नाईट रायडर्सचा प्रमुख खेळाडू आहे. या फ्रँचायझीला ३ वेळा विजेतेपद मिळवून देण्यात त्याची मोठी भूमिका राहिली आहे. IPL मध्ये एका संघाकडून खेळताना २०० विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजच्या या दिग्गज फिरकीपटूने २०१२ मध्ये KKR कडून पदार्पण केलं आणि तेव्हापासून तो याच संघाचा अविभाज्य भाग आहे.

IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • २२८ - युझवेंद्र चहल
  • २१५ - भुवनेश्वर कुमार
  • २०१ - सुनील नरेन
  • १९२ - पीयूष चावला
  • १८७- रविचंद्रन अश्विन
  • १८६ - जसप्रीत बुमराह
  • १८३ – ड्वेन ब्रावो
     

Web Title : सुनील नरेन: 200 आईपीएल विकेट लेने वाले पहले विदेशी गेंदबाज!

Web Summary : सुनील नरेन ने आईपीएल में इतिहास रचा, 200 विकेट लेने वाले पहले विदेशी गेंदबाज बने। वह चहल और कुमार के बाद तीसरे स्थान पर हैं, और केकेआर के एक प्रमुख खिलाड़ी हैं, जिन्होंने तीन चैंपियनशिप जीत में योगदान दिया। वह आईपीएल में एक टीम के लिए खेलते हुए 200 विकेट लेने वाले पहले गेंदबाज भी हैं।

Web Title : Sunil Narine: First Foreign Bowler to Reach 200 IPL Wickets!

Web Summary : Sunil Narine made IPL history, becoming the first foreign bowler to claim 200 wickets. He's the third overall, after Chahal and Kumar, and a key player for KKR, contributing to three championship wins. He is also the first bowler to take 200 wickets while playing for one team in IPL.