Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 16:57 IST2026-05-03T16:56:21+5:302026-05-03T16:57:36+5:30
truck crashed into road landslide viral video: थरकाप उडवणारा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
truck crashed into road landslide viral video: सोशल मीडियावर कायम विविध गोष्टी व्हायरल होत असतात. कधी एखादं गाणं व्हायरल होतं, तर एखादा व्हिडीओ चर्चेत येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनाली-लेह राष्ट्रीय महामार्गावर नुकताच एक अपघात घडला. एक अवजड ट्रक रस्त्यावरून जात होता. सर्व काही सामान्य वाटत होते, पण अचानक रस्त्याचा एक भाग खचला. ट्रकचा मागचा भाग जमिनीत रुतू लागला. ते दृश्य इतके भयावह होते की, तिथे उपस्थित असलेले लोक घाबरून गेले.
नेमकी काय घडली घटना?
एक ट्रक डोंगराळ भागात मार्गावरून जात असताना एका विशिष्ट ठिकाणी रस्त्याचा भाग अचानक खचला. ट्रकचा मागील भाग या खड्ड्यात अडकला आणि ट्रक एका बाजूला धोकादायक पद्धतीने झुकला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मागच्या कारच्या चालकाने तातडीने कार मागे घेतली आणि योग्य नियंत्रण राखले. जर ट्रकचा वेग जास्त असता किंवा कारचालकाचे प्रसंगावधान नसते तर ट्रक थेट दरीत कोसळण्याची शक्यता होती. पाहा व्हिडीओ-
ट्रकच्या ड्रायव्हरने मारली उडी, वाचला जीव
ट्रक खचलेल्या रोडमध्ये अडकल्यावर अखेर ड्रायव्हरने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने अडकलेल्या ट्रकचा दरवाजा उघडून थेट रस्त्यावर उडी मारली. त्यानंतर हा ट्रक काढण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. आधी बर्फ बाजूला काढण्यात आला. त्यानंतर अखेर क्रेन व जेसीबीच्या मदतीने ट्रक रस्त्याच्या खड्ड्यातून बाहेर काढला गेला.
दरम्यान, या घटनेमुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हिमालयीन पट्ट्यात डोंगराचे भाग ठिसूळ होणे आणि रस्ते खचण्याचे प्रकार वाढले आहेत. या घटनेनंतर रस्ते सुरक्षा आणि देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीमा रस्ते संघटनेने (BRO) तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रक बाहेर काढण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले.
मनाली-लेह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना आणि चालकांना प्रशासनातर्फे अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.