इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 17:48 IST2026-05-03T17:46:52+5:302026-05-03T17:48:09+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा १४ कलमी शांतता प्रस्ताव फेटाळण्याचे संकेत दिले असून पुन्हा लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.

Iran's hand of peace, Trump's warning to kick it! "If you do wrong, remember..." | इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."

इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."

मध्य पूर्व आशियातील युद्धाच्या ज्वाला अद्याप शांत झालेल्या नाहीत. इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला १४ कलमी शांतता प्रस्ताव पाठवला असला तरी, डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र इराणला पुन्हा एकदा लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या शांतता प्रस्तावावर अविश्वास दाखवत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "इराणने आतापर्यंत त्यांच्या कृत्यांची पुरेशी किंमत मोजलेली नाही. जर त्यांनी पुन्हा कोणतेही चुकीचे पाऊल उचलले, तर अमेरिका पुन्हा एकदा मोठी लष्करी कारवाई करू शकते," अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या विधानामुळे मे २०२६ मध्ये निर्माण झालेली तणावाची परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

इराणचा १४ कलमी प्रस्ताव काय आहे?

इराणच्या 'तस्नीम' आणि 'फार्स' न्यूज एजन्सीनुसार, तेहरानने पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेला एक नवा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:

सर्व आघाड्यांवरील युद्धबंदी: लेबनॉनसह सर्व ठिकाणचा संघर्ष थांबवणे.

होर्मुझची सामुद्रधुनी : जगातील महत्त्वाचा तेल मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन व्यवस्था निर्माण करणे.

नाकेबंदी हटवणे: अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती केलेली नौदलाची नाकेबंदी मागे घेणे.

परमाणु कार्यक्रम: एक महिन्याच्या युद्धबंदीनंतर इराणच्या अणू कार्यक्रमावर चर्चा सुरू करणे.

ट्रम्प यांचा अविश्वास; म्हणाले, "ही डील मान्य होण्यासारखी नाही"

फ्लोरिडा येथून मियामीला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "मला या प्रस्तावाबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र, मला वाटत नाही की हा प्रस्ताव स्वीकारला जाईल. इराणने गेल्या ४७ वर्षांत जगाचे जे नुकसान केले आहे, त्याची भरपाई या प्रस्तावातून होत नाही." जेव्हा त्यांना पुन्हा लष्करी हल्ल्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी "ती शक्यता नाकारता येत नाही," असे स्पष्ट संकेत दिले.

इराणही युद्धासाठी सज्ज?

ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मोहम्मद जफर असदी यांनी म्हटले आहे की, "अमेरिकेवर विश्वास ठेवणे कठीण आहे आणि दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष होणे अटळ आहे." तर उपपरराष्ट्र मंत्री काझम गरीबाबादी यांनी स्पष्ट केले की, आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे; त्यांनी चर्चेचा मार्ग निवडावा की युद्धाचा, हे त्यांनीच ठरवावे. इराण दोन्ही परिस्थितींसाठी तयार आहे.

Web Title : ईरान की शांति पेशकश, ट्रंप की सैन्य कार्रवाई की धमकी: तनाव बढ़ा।

Web Summary : ईरान ने पाकिस्तान के माध्यम से शांति का प्रस्ताव दिया, लेकिन ट्रंप ने अविश्वास जताते हुए सैन्य कार्रवाई की धमकी दी। उन्होंने पिछले नुकसानों का हवाला दिया और आगे गलत कदम उठाने के खिलाफ चेतावनी दी। ईरान बातचीत और संघर्ष दोनों के लिए तैयार है, और निर्णय अमेरिका पर छोड़ दिया है।

Web Title : Iran offers peace, Trump threatens military action: Tensions escalate.

Web Summary : Iran proposed peace via Pakistan, but Trump threatened military action, distrusting the offer. He cited past damages and warned against further missteps. Iran asserts readiness for both dialogue and conflict, leaving the decision to the US.