देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यापासून हा मतदारसंघ देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. ...
२०१४ मध्ये 'अच्छे दिन आने वाले है' म्हटले होते. त्यानंतर आता 'सबका साथ सबका विकास', असं सांगितलं जात आहे. २०१६ मध्ये मोदींनी 'न्यू इंडिया'ची घोषणा केली. २०१७ मध्ये 'मेरा देश बदल रहा है', २०१८ मध्ये 'साफ नियत सही विकास', २०१९ मध्ये 'मै भी चौकीदार'ची घ ...
राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. ...
पुलवामा हल्ल्यानंचर भारताने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी बालाकोट येथे एअरस्ट्राईक केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या हल्ल्यात ३०० दहशतवादी मरण पावल्याचे घोषित केले. विरोधकांनी या मत दहशतवाद्यांच्या आकड्यावर शंका घेतली.. आणि एका नवीन राजकीय वादाल ...
नरेंद्र मोदी या सभेत त्यांच्या नेहमीच्या शैलीत काँग्रेस पक्ष, राहुल गांधी यांच्यावर आक्रमण करीत पुलवामा, बालाकोट आणि 'मिशन शक्ती' याचे भांडवल करतील, असे अपेक्षित होते. ...
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आपले मौन सोडलं आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. ...