देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. कर्जबाजीरपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. ...