देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. ...
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांवर कॉँग्रेस पक्षाने दावा केला असून, हे दोन्ही मतदारसंघ पारंपरिकपणे कॉँग्रेसचे असून, या ठिकाणी निष्ठावंत तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, असा ठराव सोमवारी झालेल्या कोल्हापूर जिल्हा व शहर कॉँग्रेस ...