उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 06:31 IST2026-04-18T06:30:55+5:302026-04-18T06:31:27+5:30
Health News: वाढत्या तापमानामुळे केवळ उष्माघाताचाच नाही, तर किडनी व मूत्रमार्गाशी संबंधित आजारांचाही धोका वाढत असल्याचे दी लॅन्सेट या नियतकालिकात म्हटले आहे.

उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
वॉशिंग्टन - वाढत्या तापमानामुळे केवळ उष्माघाताचाच नाही, तर किडनी व मूत्रमार्गाशी संबंधित आजारांचाही धोका वाढत असल्याचे दी लॅन्सेट या नियतकालिकात म्हटले आहे. या संशोधनपर लेखात म्हटले आहे की, तापमानवाढ अन् डिहायड्रेळे (निर्जलीकरण) किडनीशनमु स्टोन (मूतखडे) आणि मूत्रमार्गाशी संबंधित आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
या परिस्थितीने ‘सायलेंट हेल्थ क्रायसिस’चे रूप धारण केले आहे. अमेरिकेच्या सिव्हिल डिफेन्स विभागानेही देशभर सुरू असलेल्या उष्म्याच्या लाटेबद्दल इशारा जारी केला आहे. या प्रकारच्या वातावरणात माणसाला नेहमी होणाऱ्या आजारांपेक्षा आणखी वेगळे आजारही होण्याची शक्यता या विभागाने व्यक्त केली. शास्त्रज्ञांनी उष्म्याच्या लाटेत जगभरात विविध देशांत आणखी कोणते विकार बळावतात, याचीही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था)
प्रचंड उकाड्यामुळे मूत्रमार्गाशी संसर्ग वाढतो?
मूत्रमार्गाच्या संसर्गाचा विकार विशेषतः महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. उष्ण आणि दमट हवामान हे जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक असते.
उन्हाळ्यात आपण कमी पाणी पितो, त्यामुळे मूत्राशयातील हानिकारक जिवाणू शरीराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे मूत्रमार्गामध्ये संसर्ग होण्याची शक्यता बळावते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. या विषयावर अमेरिका व आणखी काही देशांमध्ये सखोल संशोधन सुरू आहे.
किडनीवर परिणाम
तापमान वाढल्यावर शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त घाम येतो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवी अधिक दाट होते आणि शरीरातील
कॅल्शियम, युरिक ॲसिड आदी घटक किडनीमध्ये क्रिस्टलच्या स्वरूपात साचू लागतात. पुढे याचेच मूतखड्यात रूपांतर होऊ शकते.
काय काळजी घ्याल?
दिवसाला १० ते १२ ग्लास पाणी प्या.
चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक कमी प्या.
पाण्याचे प्रमाण असलेली फळे खा.
दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा.