लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 07:45 IST2026-04-18T07:44:59+5:302026-04-18T07:45:17+5:30
Dombivli News: ठाण्याहून आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. संध्याकाळी सातच्या सुमारास ठाणे ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासात हा प्रकार घडला.

लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
डोंबिवली - ठाण्याहून आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. संध्याकाळी सातच्या सुमारास ठाणे ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासात हा प्रकार घडला.
गर्दीच्यावेळी महिलेला बाजूला सरक असे सांगितल्यावरून दुसरी महिला संतापली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच चिघळला आणि संतप्त महिलेने समोरच्या महिलेला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ प्रवाशांनी मोबाइलमध्ये कैद केल्यानंतर समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने या प्रकरणाची सध्या चर्चा सुरू आहे.