गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 06:36 IST2026-04-18T06:35:49+5:302026-04-18T06:36:35+5:30
Viral Video: एका व्हायरल व्हिडिओत एक गाय रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या मुलीचा जीव वाचवत असल्याचा दावा केला आहे. यात वेगवान ट्रेन येते आणि शेवटच्या क्षणी गाय अचानक येते अन् ती मुलीला ओढून बाजूला करताना दिसते.

गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
एका व्हायरल व्हिडिओत एक गाय रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या मुलीचा जीव वाचवत असल्याचा दावा केला आहे. यात वेगवान ट्रेन येते आणि शेवटच्या क्षणी गाय अचानक येते अन् ती मुलीला ओढून बाजूला करताना दिसते. मात्र हा व्हिडीओ एआयच्या मदतीने बनविलेला असल्याचे आढळले. १५ एप्रिल रोजी एका व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला. माणसांनी बघ्याची भूमिका घेतली पण एका प्राण्याने माणुसकी दाखविली अशाही प्रतिक्रिया आल्या. मात्र गाय अशा रीतीने एखाद्याला कशी वाचवू शकेल, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.