काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण

By राजकुमार जोंधळे | Updated: April 18, 2026 07:10 IST2026-04-18T06:59:49+5:302026-04-18T07:10:48+5:30

Crime News: ‘माझ्या पोराला मारू नका रे, त्याला सोडून द्या...’ एका असहाय मातेची ही आर्त हाक त्या नराधमांच्या कानी पडली नाही. धाराशिव जिल्ह्यात एका तरुणाला निर्जनस्थळी नेऊन बेल्ट, लाकूड आणि उसाने अमानुषपणे झोडपल्याचा एक मन सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Heartbreaking cruelty! Child brutally beaten in front of mother's eyes | काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण

काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण

- राजकुमार जाेंधळे
धाराशिव - ‘माझ्या पोराला मारू नका रे, त्याला सोडून द्या...’ एका असहाय मातेची ही आर्त हाक त्या नराधमांच्या कानी पडली नाही. धाराशिव जिल्ह्यात एका तरुणाला निर्जनस्थळी नेऊन बेल्ट, लाकूड आणि उसाने अमानुषपणे झोडपल्याचा एक मन सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, तीन पुरुष आणि एक महिला या तरुणाला घेरून उभे आहेत. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई केविलवाणी विनवणी करत होती. तोवर एकाने हातातल्या बेल्टने तरुणाच्या हाता-पायावर सपासप फटके मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्याने लाकडाने आणि तिसऱ्याने उसाने त्याला बेदम मारले. इतक्यावरच न थांबता, एकाने बेल्ट तरुणाच्या गळ्यात अडकवून त्याला जमिनीवर ओढले. तो तरुण जीवाच्या आकांताने 'मला वाचवा' म्हणून ओरडत होता, पण उपस्थित महिलेनेही त्याला मारहाण करत आपली क्रूरता सिद्ध केली. या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक खोकर यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत. हा व्हिडीओ परांडा, वाशी की भूम तालुक्यातील आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सायबर सेलच्या मदतीने व्हिडीओत दिसणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एका मातेच्या डोळ्यादेखत घडलेल्या या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title : दर्दनाक हमला: माँ के सामने बेटे को बेरहमी से पीटा; वीडियो से देश स्तब्ध

Web Summary : धाराशिव जिले से एक चौंकाने वाला वीडियो सामने आया है जिसमें एक युवक को बेरहमी से पीटा जा रहा है, जबकि उसकी माँ दया की भीख मांग रही है। हमलावरों ने बेल्ट, लाठियों और गन्ने का इस्तेमाल किया। पुलिस इस अमानवीय कृत्य की जांच कर रही है, जिससे आक्रोश फैल गया है।

Web Title : Brutal Assault: Son Beaten Mercilessly Before Mother's Eyes; Video Shocks Nation

Web Summary : A shocking video from Dharashiv district shows a young man brutally beaten while his mother pleads for mercy. The assailants used belts, sticks, and sugarcane. Police are investigating the inhumane act, sparking outrage.