देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
2004 मध्ये राजकारणात प्रवेश केलेले राहुल गांधी यांच्याकडे 2007 मध्येही काँग्रेस महासचिवपदाची जबाबदारी आली. राहुल यांनीच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसमध्ये पदांवर निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्याची सुरुवात केली. ...
गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याच्या उपस्थित राहिलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणात आपण दोष नसल्याने न्यायालयासमोर सांगितले. ...
राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा मागील कार्यकारणी बैठकीत स्वीकारला नसला तरी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे केलेल्या आवाहनानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यकारणीची बैठक घेतली जाणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले ...