देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वीस दिवस झाले तरी, सरकार स्थापन होत नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. ज्या पक्षाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत तयार होते, त्यांनी सरकार स्थापन करण्यास नकार देऊन राज्यावर वेगळी परिस्थिती आणली आहे. ...
राजकीय अनिश्चितता दूर करण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ संपवून राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, ही सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही जबाबदारी आहे. सरकार स्थापनेतील वाढता विलंब आमदारांसह जनतेचा आशावाद मावळून टाकणारा आहे. ...
महाशिव आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही पक्षांचे नगरसेवकदेखील सोमवारी (दि.१८) सहलीसाठी रवाना झाले आहेत. या पक्षांनी थेट कोणत्याही प्रकारची मागणी केली नसली तरी आता मात्र उपमहापौरपदासह काही पदा ...
सोमवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिकेतील विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या कक्षात घुसले. विरोधीपक्षनेता निष्क्रीय असल्याचा आरोप करीत त्यांना गोंधळ घातला. मुर्दाबादचे नारे देत खूर्च्यां फेकून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ...