देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षातील पूर्णवेळ अध्यक्षाची गरज अधोरेखित झाली आहे. ज्या काँग्रेसने दिल्लीत 15 वर्षे सत्ता मिळवली त्या काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा येथे खातंही उघडता आलेलं नाही. ...
Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'विरुद्ध भाजपाने 8 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. 2015 च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या पाच जागा वाढल्या आहे ...
कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...