देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
वंचित, काँग्रेस एकत्र आले पाहिजेत, ही जनभावना आहे. याचा आदर झाला पाहिजे, असे वाटणारा मी कार्यकर्ता आहे. या गोष्टी घडून येत नाहीत, हे दुःखद आहे, असे सपकाळ म्हणाले. ...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणी मोठा दावा केला आहे. यामुळे चव्हाण चर्चेत आले आहेत, त्यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळातील किस्से सांगितले आहेत. ...
Sam Pitroda News: इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. परदेश दौऱ्यांदरम्यान, राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जाते, असा आ ...