श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अजित पवारांच्या निधनामुळे त्यांच्याकडील अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहे. महत्त्वाचे असलेले अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की नाही, याबद्दलची चर्चा सुरूच आहे. ...
VVMC Mayor Election 2026: वसई विरार मनपाच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने भाजपाचा पराभव केला. ...
PCMC Mayor उपमहापौरपदासाठी नाव जाहीर करूनही शीतल शिंदे यांनी नकार दिला तर भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे महापौरपदासाठी इच्छुक असल्याने ते नाराज झाले ...
Nagpur : १५१ सदस्यीय नागपूर महापालिकेत भाजपकडे १०२ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौरांची निवड बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, काँग्रेसनेही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Pune Mayor काँग्रेसकडून येरवडा - गांधीनगर भागाच्या नगरसेविका अश्विनी लांडगे महापौरपद तर वानवडी भागातून साहिल केदारी हे उपमहापौरपदाच्या शर्यतीत उतरले असून राष्ट्रवादी सुद्धा उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे ...