भुसावळ येथील जळगाव रोडवरील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवर सहा जणांनी तलवारीने विकास देवीदास कोळी (वय ४०) या कामगारावर प्राणघातक हल्ला केला. यात विकास हा गंभीर जखमी झाला. ही घटना २५ मे रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...
भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील पाणी टँकर गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शनिवारी चौकशी केली असून, तालुक्यात ज्या गावांना टँकर देण्यात आले आहे, त्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. ...
जबलपूर येथून १२१६८ अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेस या गाडीने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाची बॅग भुसावळ येथे उतरलेल्या लग्न वºहाड्याजवळ सापडली आहे. स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून त्वरित तपास लागला. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वेने विनातिकीट, अनधिकृत फेरीवाले, विनाबुक सामान यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या तपासणी मोहिमे दरम्यान २ कोटी ९५ लाख ९१ हजार २६७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बुद्रूक येथे गेल्या सात-आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे तब्बल २० ते २२ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी शेजारील कन्हाळे खुर्द गावात भटकंती करावी लागत आहे. ...