भुसावळ येथे एकावर तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:44 PM2019-05-25T22:44:53+5:302019-05-25T22:46:33+5:30

भुसावळ येथील जळगाव रोडवरील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवर सहा जणांनी तलवारीने विकास देवीदास कोळी (वय ४०) या कामगारावर प्राणघातक हल्ला केला. यात विकास हा गंभीर जखमी झाला. ही घटना २५ मे रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली.

One attacking sword in Bhusawal | भुसावळ येथे एकावर तलवार हल्ला

भुसावळ येथे एकावर तलवार हल्ला

Next
ठळक मुद्देकाच बंगल्यातील घटनासहा आरोपी फरारभुसावळ शहरात खळबळ

भुसावळ, जि.जळगाव : येथील जळगाव रोडवरील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवर सहा जणांनी तलवारीने विकास देवीदास कोळी (वय ४०) या कामगारावर प्राणघातक हल्ला केला. यात विकास कोळी हा गंभीर जखमी झाला. ही घटना २५ मे रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या जळगावरोडवरील काच बंगल्यातील विहिरीवरुन सध्या शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याचे नियोजन येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांच्याकडे कामाला असलेले विकास देवीदास कोळी (वय ४०, रा.भुसावळ) यांच्याकडे आहे. २५ रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास कोळी व टँकरचालक काच बंगल्यात बसलेले होते. तेव्हा सहा जण दुचाकींवर काच बंगल्यात घुसले. त्यातील एकाने विकास कोळी यांना काच बंगल्यातून बाहेर बोलावले व विहिरीकडे घेऊन गेले. त्याठिकाणी आलेल्या अज्ञात सहा जणांनी त्यांच्यावर दोन तलवारींनी वार केले. यात त्यांच्या डोक्याला, दोन्ही पाय व उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहे.
यावेळी परिसरात टँकर भरण्यासाठी आलेले टँकरचालकही उपस्थित होते. हल्ला सुरू होताच हल्लेखोरांनी टँकर चालकांना निघून जाण्याचा दम दिला. त्यानुसार त्यांनीही तेथून पळ काढला. हल्लेखोर कोळी यांना गंभीर जखमी करून दुचाकींवरुन पसार झाले. यानंतर टँकरचालकांनी कोळी यांना येथील पालिका रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने तत्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे जखमी कोळी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती समजताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सरकार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनीही घटनास्थळी भेट देऊन जखमी कोळी यांची विचारपूस केली.
याबाबत शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, आठवडाभरात हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. २१ रोजी भर बाजारात तेली समाज मंगल कार्यालयाजवळ एका लग्नामध्ये प्रवीण चौधरी यांच्यासह त्यांच्या भावावर चॉपर, लोखंडी रॉडने वार करण्यात आला होता. यात ते दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शहरात तलवार चाकू चॉपर हल्ल्यामध्ये वाढ झाली झाली आहे. त्यामुळे शहरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: One attacking sword in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.