उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच ठाण्यावर देखील पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. शुक्रवार पासून कळवा, मुंब्रा भागातून पाणी कपातीला सुरवात झाली आहे. तर पुढील आठवड्यात ठाणे शहराला पाणी कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
वरळी सी-लिंकवरून २३ वर्षीय तरुण गुरुवारी समुद्रात पडल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्याचा शोध सुरू असताना दादर चौपाटीच्या किना-याजवळ तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. निखार जगदीश साहू असे त्याचे नाव असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने आत् ...
भार्इंदरमधील भुयारी मार्गात अल्पवयीन मुलीवर तरुणाने चाकूने वार केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनोदकुमार कश्यप याला अटक केली आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. ...
कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. त्याचा फटका ठाण्यासह जिल्ह्यातील उद्योगांनाही बसला. अनेकांना नव्या वर्षात दिलेल्या तारखेला निर्यात करायची होती. ...
कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद बुधवारी दिवसभर उमटले आणि सायंकाळी मात्र आरपीआय (आठवले गटा)चे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शर्मा यांनी चक्क रस्ता अडवून आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी अश्लिल भोजपुरी गाण्यांवर नृत्य केली गेली ...
धर्म आणि जातपात विसरून मुंब्य्रातील काही मुस्लिम तरु णांनी एका हिंदूबांधवाच्या अंतिम संस्काराचे सोपस्कार पूर्ण करून अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले. एकीकडे स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही काही भागांत आजही जात विसरली जात नसून एकमेकांच्या जातीवरून अनेका ...
उल्हासनगर पालिकेत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत विविध कारणांवरून राजकारण सुरू असून वादाची एकही संधी सोडत नाही. पालिका शाळेचे परस्पर उद््घाटन करण्याचा घाट शिवसेनेने आखला होता. मात्र, निमंत्रणपत्रिकेत महापौर, आयुक्त, शिक्षण मंडळ सभापतींचे नाव नसल्याने ह ...
सातत्याने होणाºया भारनियमनाबाबत तक्रार न करता त्यावर ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न मुरबाडमधील तुषार बाळू रोकडे याने केला आहे. सहावीत शिकणा-या तुषारने भंगारातील वस्तूंपासून एक मशीन बनवून या ‘बत्ती गुल’वर आपल्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ...