शालेय विद्यार्थिनीवर चाकूने वार, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:41 AM2018-01-05T06:41:50+5:302018-01-05T06:42:06+5:30

भार्इंदरमधील भुयारी मार्गात अल्पवयीन मुलीवर तरुणाने चाकूने वार केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनोदकुमार कश्यप याला अटक केली आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.

 The schoolgirl stabbed the knife, the accused arrested | शालेय विद्यार्थिनीवर चाकूने वार, आरोपीला अटक

शालेय विद्यार्थिनीवर चाकूने वार, आरोपीला अटक

Next

मीरा रोड - भार्इंदरमधील भुयारी मार्गात अल्पवयीन मुलीवर तरुणाने चाकूने वार केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनोदकुमार कश्यप याला अटक केली आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
भार्इंदर पश्चिमेस राहणारी पीडित मुलगी भार्इंदर पूर्वेच्या शाळेत शिकते. बुधवारी सकाळी तिची आई तिला शाळेत सोडण्यासाठी जात होती. पावणेसातच्या सुमारास भार्इंदर भुयारी मार्गातून जात असताना अचानक विनोदकुमार याने मागून जाऊन दोघींना गाठले. आईला धक्का देत त्याने चाकूने मुलीवर वार करत पळ काढला. त्याच वेळी तेथून जाणाºया उमाशंकर यादव या रिक्षाचालकाने दोघींना पाहिले आणि त्वरित रुग्णालयात नेले. पण, तेथे उपचार न मिळाल्याने मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
विनोदकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो भार्इंदर पूर्वेच्या एका स्टील कारखान्यात नोकरीला आहे. दीड ते दोन वर्षांपासून तो पीडित मुलीचा पाठलाग करायचा. या जाचाला कंटाळलेल्या त्या मुलीने अखेर घडलेला प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यानंतर, तिच्या पालकांनी विनोदला समज दिली होती. याचा राग आल्याने विनोदने बुधवारी सकाळी हा हल्ला केला.

Web Title:  The schoolgirl stabbed the knife, the accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.