खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर याठिकाणी किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ऊसतोडणी मळणी यंत्राला (हॉर्वेस्टर) अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऊसतोडणी मळणी यंत्राला आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली, अशी चर्चा घटनास्थळी होत ...
ग्रंथालयाच्या अनुदानात तिप्पट वाढ करावी, या मागणीसाठी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरात राज्य संघटनेच्या पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी कृष्णा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच शहर पोलिसांनी तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. ...
मुंबई येथे अॅव्हिएशन टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पळशी, ता. माण येथील अभिषेक आनंदा गंबरे या विद्यार्थ्याला आधार नोंदणी केल्यानंतर सहा वर्षे उलटले तरी आधार कार्ड मिळाले नाही. ...
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने कधीच ही भूमिका बजावली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा मिळाला नाही. ...
अनेक वर्षांपासून पाटण तालुक्याने केंद्रात केलेल्या नेतृत्वाला मतदार संघ विभाजनाचा फटका बसला आणि तालुक्याची खासदारकीची परंपरा दहा वर्षांपूर्वी खंडित झाली. कोणाला कोणत्या पक्षातून ...
कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या बालसंगोपन रजेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेने दप्तरी आदेशाद्वारे या रजा मंजूर करण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार कार्यालय प्रमुखांना दिल्याने ...
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आ ...
आगाशिवनगर, ता. कऱ्हाड येथील झोपडपट्टीतील दांगटवस्तीत अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. मंगळवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. ...