कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील कर्जत ते डोणे भागात रस्त्याच्या कडेला रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु खोदकाम करताना साइडपट्टी खचली आहे. ...
अलिबाग आणि पेण तालुक्यांतील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांना उधाणाच्या भरतीने मोठी भगदाडे (खांडी) पडली आहेत. त्यामुळे हजारो एकर भात शेतीत खारे पाणी घुसून ती नापीक झाली आहे. ...
२0१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकापचे तत्कालीन उमेदवार तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य बाळाराम पाटील यांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधातील निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...
येथील मुख्यालय ठिकाणच्या प्रशासकीय इमारतीमधून रायगड जिल्ह्याचा कारभार चालतो. त्याच प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचे पहायला मिळत आहे. इमारतीमध्ये आग विझवण्यासाठी बसवण्यात आलेली आगविरोधी यंत्रणा कालबाह्य झाल्याने ती कुचकामी ठरत आहे. ...
रसायनी येथील आठपेक्षा जास्त गावांची १६०० एकर जमीन भारत सरकारने १९६० मध्ये संपादित केली आहे. यातील काही जमीन कंपनीने वापरात आणली तर काही जमीन शिल्लक असून तेथे गेल्या साठ वर्षे शेतक-यांची वहिवाट असून शेतलागवड केली जाते. ...
रायगड जिल्ह्यामध्ये क्षयरोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या तीन टक्क्यांनी घटली असली तरी, उत्तर रायगडमध्ये स्थलांतरित क्षय रुग्णांमुळे रायगड जिल्ह्यावरील धोका हा कायम आहे. ...
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये निधी खर्चून सुरू केलेले बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे. ...
स्वत:च्या जागेत असलेल्या मंदिराच्या जीर्णोध्दारास विरोध करणाºया कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील शेल या गावात हा प्रकार घडला आहे. ...
शेती व इतर क्षेत्राचा विकास करून त्या विकासाच्या माध्यमातून आपला रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी खांदेश्वर येथे केले. ...