ठाणे येथील खारभूमी विकास विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. आव्हाड यांनी गुरुवारी अलिबाग तालुक्यातील मेडेखार व देहेनकोनी येथे पथकासह संरक्षक बंधाऱ्यांच्या अवस्थेची पाहणी केली. ...
उरण तालुक्यात धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आयओटीएल कंपनीमध्ये व्ही. बी. इंजिनीअरिंग या खासगी ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी मागील १५ दिवसांपासून वेतनवाढीची मागणी मान्य न झाल्याने बुधवारपासून काम बंद आंदोलन केले. ...
श्रीवर्धन शहरांचे प्रवेशद्वार असलेल्या बोडणी घाटात अपघाताची मालिका सुरू आहे. २०१२ ते २०१८ दरम्यान झालेल्या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप याबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही. ...
तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे या पुलाचे डागडुजीकरण करणे आवश्यक आहे. वेळेत लक्ष न दिल्यास पूल कोसळण्याच ...
उन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...
७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात. ...
कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेले ड्रायफ्रुट काजू व त्याच्या बी चे जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन शेकडो किलो माल निर्यात होत असल्याने काजु बीचे व्यापारी खुशील सहाने यांनी सांगितले. ...
पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. ...