बजाज आॅटो कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांची विश्वकल्याण कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कामगार प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली, त्यामुळे विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी पाचव्या दिवशी शुक्रवारी उपोषण मागे घेतले. ...
सांडपाणी दारात येत असल्याच्या कारणावरून खडकी, महादेववाडी येथे भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांना आरोपींनी धारदार शस्त्राने जखमी केले. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रसरकारने निर्यात मूल्य शून्य केले, असे प्रतिपादन चाकण येथील आंदोलनात आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी केले ...
रुपी बँकेबाबत तोडगा काढावा या मागणीसाठी रुपी खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ‘संताप’ मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
महाशिवरात्री व होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते पटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे. दि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून ही गाडी सोडण्यात येईल. ...
सध्या जातपडताळणी समितीकडे दाखल्याचे प्रचंड काम असून, अर्ज केल्यानंतर वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे ही अट रद्द करावी अशा मागणीची अनेक निवेदने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होत आहेत. ...
बाणेर-बालेवाडी परिसरात इमारतीच्या टेरेसवर हॉटेल सुरू आहेत. या हॉटेलमध्ये जाण्यासाठी पुरेशी सुरक्षितता नाही. अपघात झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. ...
शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल शाम भरगुडे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, साठे कॉलनी) याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला. ...
रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत सहभागी होणार आहेत. ...
लष्कर येथील पदपथावर झोपडी करून राहणा-या एका कॅप्टन दर्जाच्या निवृत्त लष्करी अधिका-याचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. १) मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी घडली. ...