जगातील सर्वात श्रीमंत WWE सुपरस्टार; कमाई ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:02 PM2020-06-11T14:02:24+5:302020-06-11T14:05:27+5:30

माईक फोलेय - चार वेळा जागतिक जेतेपद आणि 11वेळा वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियन असलेल्या फोलेय याची कमाई 111 कोटी 53 लाख 95,979 इतकी आहे.

ख्रिस जेरिको - कॅनडाचा सर्वात प्रसिद्ध रेसलर जेरिकोनं 2001 मध्ये दी रॉक, ट्रीपल एच आणि स्टोन कोल्ड स्टी ऑस्टीन यांना पराभूत करून धमाका उडवला होता. त्याची कमाई 133 कोटी 74 लाख 30,200 इतकी आहे.

बिग शो - WCW, WWE, World Heavyweight आणि ECW World titles जिंकणारा एकमेव खेळाडू असलेला बिग शो 149 कोटी 16 लाख 60,619 कमावतो.

ब्रॉक लेसनर - वयाच्या 25 व्या वर्षी WWE Champion ( 2002) बनणारा युवा खेळाडू ब्रॉक लेसनर 'बीस्ट' म्हणून ओळखला जातो. 182 कोटी 88 लाख 40,258 इतकी कमाई आहे.

कर्ट अँगल - चार WWF/WWE Championship जेतेपदं, एक WCW Championship आणि एक World Heavyweight Championship कर्ट अँगलच्या नावावर आहे. 182 कोटी 88 लाख 40,258 इतकी कमाई आहे.

हल्क हॉगन - या खेळाडूच्या नावावर 12 world champion जेतेपद आहेत. त्यात सहा WWF World Heavyweight Champion/WWF Champion आणि सहा WCW World Heavyweight Champion जेतेपद आहेत. त्याची कमाई 192 कोटी 54 लाख 91,157 इतकी आहे.

ट्रिपल एच - 25 championships त्यात 9 WWF/WWE Champion आणि 5 WWE's World Heavyweight Champion जेतेपदाचा समावेश आहे. 301 कोटी 21 लाख 22,861 इतकी कमाई.

स्टोन कोल्ड स्टी ऑस्टीन - 338 कोटी 72 लाख 60,396

जॉन सीना - 413 कोटी 60 लाख 84,430

दी रॉक ( ड्वेन जॉन्सन) - 1923 कोटी 69 लाख 13,762