PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:29 AM2024-05-04T11:29:54+5:302024-05-04T11:43:24+5:30

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी निधीने हजेरी लावली होती.

भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ इतर खेळाडूंप्रमाणे आयपीएलमध्ये व्यग्र आहे. तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा भाग आहे.

पण, खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या पृथ्वीला अनेकदा बाकावर बसवण्यात आले. आयपीएल खेळत असलेल्या पृथ्वीला चीअर करताना त्याची गर्लफ्रेंड निधी तापडिया दिसली.

निधी तापडिया आणि पृथ्वी शॉ हे मागील काही कालावधीपासून एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते. अनेकदा त्यांचे एकत्र फोटो समोर आले आहेत.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी निधीने हजेरी लावली होती. ती पृथ्वीला चीअर करण्यासाठी आली पण या सामन्यात त्याला संधीच मिळाली नाही.

या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध पृथ्वीने ४३ धावांची खेळी केली तेव्हा निधीने त्याच्यासाठी इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

निधी तापडियाने दिल्ली कॅपिटल्सला चीअर करतानाचे फोटो शेअर केले आहेत. निधी आणि पृथ्वी यांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगले आहे.

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड निधी पेशाने एक मॉडेल आहे. तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत.

निधी तापडियाचे इंस्टाग्रामवर १.८ लाख फॉलोअर्स आहेत. ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे.