रोज सकाळी ‘ही’ १ गोष्ट पाण्यात भिजवून खा, अशक्तपणा-थकवा-चिडचिड विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 09:40 IST2026-04-28T09:35:57+5:302026-04-28T09:40:01+5:30

खजूर अतिशय पौष्टिक असतात. त्यामुळेच ते रोज खायला हवे असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. जर तुम्ही रोज एक पाण्यात भिजवलेला खजूर खाल्ला तर त्याचे आरोग्याला कसे लाभ होतात ते पाहा..

खजूरामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्यांनी खजूर नियमितपणे खायला हवा.

खजुरामध्ये नॅचरल शुगर आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्यातून लगेचच एनर्जी मिळते आणि पुढे बराच वेळ ती टिकून राहाते.

खजूर प्री बायोटीक म्हणूनही काम करतं. म्हणजेच त्याच्यातून असे काही चांगले बॅक्टेरिया मिळतात जे पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत करतात.

खजुरामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळेच ते थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करतात. शिवाय खजुरामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात.

खजूर रात्रभर पाण्यात भिजत घालून जर दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ले तर ते पचायला अधिक सोपे जातात. ही माहिती आहारतज्ज्ञांनी leemamahajan या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.